बलरामपूर : बजाज हिंदूस्थान शुगर लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक अजय शर्मा यांनी कार्यक्षेत्रातील गावांचा दौरा करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या ऐकून घेतल्या. चांगल्या उत्पादनासाठी त्यांना मार्गदर्शन केले. ऊस उत्पादन वाढीबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
अजय शर्मा यांनी दोन दिवसात बाराहून अधिक गावांचा दौरा केला. ते म्हणाले, शेतकऱ्यांनी वेळेवर उसाला पाणी द्यावे. विविध किड, रोगांचा फैलाव झाल्याचे दिसून आल्यास ऊस विकास अधिकारी अथवा कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. ऊस पिकाला अधिकाधिक पाण्याची गरज असते. मात्र, योग्य वेळी त्याची दक्षता घेतल्यास परिश्रम वाया जाणार नाहीत असे शर्मा यांनी सांगितले. यावेळी त्यांनी प्रगतशील शेतकऱ्यांशी चर्चा केली. शर्मा यांनी त्यानंतर कारखान्यात बैठक घेतली. आगामी गळीत हंगामाच्या तयारीचा आढावा घेतला. यावेळी युनिट हेड राकेश यादव, केन हेड संजीव शर्मा, कोमल सिंह, अमोल कुमार बिश्नोई, एन. के. शुल्का, बृजेश चंद्र मंडल, के. पी. सिंह, अशोक पांडे आदी उपस्थित होते.