श्रीदत्तगंज (बलरामपूर) : बजाज साखर कारखाना इटईमैदा च्या वतीने बुधवारी जागरुकता रॅली काढण्यात आली. रॅलीच्या माध्यमातून शेतकर्यांना ऊसाची शेती आधुनिक पद्धतीने करण्यासाठी जागरुक करण्यात आले. याबाबत माहिती देवून शेतकर्यांचे प्रबोधन करण्यात आले.
हिरवा झेंडा दाखवून रॅलीला सुरुवात करण्यात आली. यावेळी बोलताना कारखान्याचे संचालक पीएस चतुर्वेदी म्हणाले, ऊसाची शेती ही रोखीचे पीक आहे. ही शेती चांगल्या प्रकारे करुन आपल्या आर्थिक अडचणी दूर करण्याचे हे एक महत्वाचे साधन आहे. कारखाना व्यवस्थापन शेतकर्यांसोबत आहे.
ऊस लागवडीसाठी शेतकर्यांना वेळेवर खत, बी बियाणे, किटकनाशकांची फवारणी करावी याबाबत सांगण्यात आले. रॅलीच्या माध्यमातून शेतकर्यांना ऊस लागवडीची पद्धत, शेती तयार करण्याची पद्धत, ऊसासाठी जमीन शोधणे, ऊस बियांची निवड, त्याचा प्रयोग याबाबत माहिती देवून जागरुकता करण्यात आली. याप्रसंगी मॅनेजर रामायण पांडेय, केपी सिंह, श्रवण व ध्रुव कुमार आदी उपस्थित होते.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.