अयोध्या : बलरामपूर साखर कारखाना लिमिटेडच्या रौजगाव युनिटने चालू गळीत हंगाम २०२०-२१ मध्ये २२ मार्च अखेरपर्यंत खरेदी केलेल्या उसापोटी सुमारे ७ कोटी ७४ लाख रुपयांची ऊस बिले शेतकऱ्यांना अदा केली आहेत.
साखर कारखान्याचे विभाग प्रमुख निष्काम गुप्त यांनी सांगितले की, ऊस बिले शेतकऱ्यांच्या संबंधित बँक खात्यांमध्ये पाठविण्यात आली आहेत. रौजगाव साखर कारखान्याकडून कार्यक्षेत्रातील गावांमध्ये उसाचा सर्व्हे सुरू आहे. त्यामुळे कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांनी आपल्या विभागातील ऊस पर्यवेक्षकांशी संपर्क साधावा. आपल्या शेतातील उसाचा सर्व्हे योग्य प्रकारे करुन घ्याा. त्यामुळे नंतर ऊस कारखान्याला पाठवताना कोणतीही अडचण होणार नाही.
यावेळी कारखान्याचे ऊस विभागाचे महा व्यवस्थापक इक्बाल सिंह यांनी साांगितले की, ऊस पिकावर कन्सुआ आणि इतर किडींचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी तसेच अधिक उत्पादन मिळावे यासाठी शेतकऱ्यांनी कोराजन औषधाचे ड्रिचिंग करावे. ड्रिचिंगच्या माध्यमातून या औषधाचा फक्त एकदाच वापर करावा अशा सूचनाही त्यांनी केल्या आहेत.
महा व्यवस्थापक सिंह म्हणाले, गेल्या वर्षीप्रमाणेच कारखान्याकडून अनुदानावर उसाच्या प्रगत जातींचे बियाणे दिले जात आहे. त्याचा शेतकऱ्यांनी आडसाली पेरणी शेतकऱ्यांना दुहेरी शेती करणे शक्य आहे. तसेच अधिक उत्पादनाचा लाभ मिळवावा.