आजमगड: शेतकर्यांना ऊसाचे पैसे मिळेपर्यंत साखर कारखाने ऊस शेतकर्यांना बी, खत, कीटकनोशक आणि कृषी रोपे देणार. यासाठी शासनाने निर्देश जारी केले आहेत. सरकारने सांगितले की, साखर कारखाने इच्छुक शेतकर्यांना त्यांच्या सहमतीच्या आधारावर शेतकर्यांच्या आवश्यकता पूर्ण केल्या जातील . यामध्ये जे मूल्य जाईल त्याची कपात ऊस थकबाकी भागवताना समायोजित केली जाईल. यामुळे शेतकर्यांना मोठा दिलासा मिळेल.
ऊस शेती करणाऱ्या शेतकर्यांनी लागवड केली आहे. शेतकर्यांना पीकाच्या सुरक्षेसाठी खत, कीटकनाशक आदींची गरज आहे. येणार्या दिवसात पावसाच्या ओलाव्यामुळे कीटकांचा प्रादुर्भाव वाढला आहे. अनेक शेतकर्यांना ऊसाचे पैसे भागवले गेले नाहीत. लॉकडाउनमुळे शेतकर्यांसमोर आर्थिक संकट आहे. यासाठी शासनाने साखर कारखान्याला आदेश दिले आहेत की,त्यांनी शेतकर्यांना कीटकनाशक, खत आणि इतर कृषी भांडवल उपलब्ध करावे. जिल्हा ऊस अधिकारी अशरफी लाल यांनी सांगितले की, इच्छुक शेतकर्यांना त्यांच्या सहमतीने ऊस बि, कीटकनाशक, खत आणि कृषी अवजारे व इतर कृषीसाठी लागणारे भांडवल उपलब्ध करवून त्याची भरपाई ऊस मूल्यामध्ये समायोजित केली जाईल. शेतकरी आपल्या ऊस पर्यवेक्षकांशी संपर्क करुन त्याचा लाभ घेवू शकतात.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.