कुंभोज: हुपरी येथील जवाहर सहकारी साखर कारखान्याच्या नूतन अध्यक्ष पदी माजी खासदार श्री.कल्लापाण्णा आवाडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली तसेच, कुंभोजचे माजी सरपंच असणारे बाबासाहेब चौगुले यांची सलग चौथ्यांदा जवाहर कारखान्याच्या संचालकपदी निवड झाली आहे. तर व्हाईस चेअरमनपदासाठी त्यांना दुसऱ्यांदा संधी मिळाली आहे. जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे यांची कारखान्याच्या संचालकपदी निवड झाली. त्यानंतर आवाडे आणि चौगुले गटाच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी आणि गुलालाची उधळण करून आनंद व्यक्त केला.
दरम्यान, जवाहर सहकारी साखर कारखान्याची निवडनुक बिनविरोध झाल्याने सभासदांतून समाधान व्यक्त होत आहे. सभासदांनी आणि संचालक वर्गाने घेतलेला निर्णय योग्य आहे. कारखाना व्यवस्थापन व संचालक मंडळ सभासदांच्या हिताचेच निर्णय घेईल, अशी भावना सभासदांतून व्यक्त होत होत्या.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.