बस्ती : बननान साखर कारखान्यात २७ नोव्हेंबरपासून ऊस गाळप सुरू होणार आहे. जिल्हा ऊस अधिकारी मंजूर सिंह यांनी गुरुवारी कारखान्याच्या तयारीचा आढावा घेतला. यंदाच्या हंगामात १३० कोटी रुपये खर्चून नवा प्लांट उभारण्यात आला आहे. त्यातून प्रती दिन एक लाख क्विंटल उसाचे गाळप होऊ शकेल. यापूर्वी ही क्षमता ८० हजार क्विंटलची होती. प्लांट उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. सध्याच्या हंगामात कारखान्याने ७९ ऊस खरेदी केंद्रे सुरू केली आहेत.
जागरणमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, बभनान साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात ३६,३५० हेक्टरमध्ये ऊस लागवड करण्यात आली आहे. त्यामुळे या हंगामात सुमारे एक कोटी ३२ लाख क्विंटल ऊस गाळप करण्यात येईल असे अनुमान आहे. बभनान साखर कारखान्याचे मुख्य महाव्यवस्थापक दिनेश राय यांनी सांगितले की, कारखाना २७ नोव्हेंबर सुरू करण्यात येणार आहे. नव्या प्लांटची चाचणी १३ ते १६ नोव्हेंबर या कालावधीत घेण्यात येणार आहे.