हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.
नवी दिल्ली : साखर कारखान्यांमधील सह वीज निर्मितीप्रकल्पात वापरण्यात येणार बगॅस हा साखर उद्योगासाठी भविष्यात डोकेदुखी ठरणार आहे, असं मत साखर उद्योगातील जाणकार व दी शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन ऑफ इंडिया (एसटीएआय) या संस्थेचे अध्यक्ष संजय अवस्थी यांनी हे मत व्यक्त केले आहे. या संस्थेने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात त्यांनी हे मत व्यक्त केले आहे.
अवस्थी म्हणाले, ‘साखर उद्योगात पुढच्या पाच वर्षांत बगॅस ही खूप मोठी समस्या होणार आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये अतिरिक्त वीज उत्पादन होत आहे. त्याचबरोबर भारतात सौरऊर्जा, पवन ऊर्जा यांच्या माध्यमातू उर्जेचे शाश्वत स्रोत मोठ्या प्रमाणावर काम करत आहेत. देश हळू हळू १०० टक्के वीज उपलब्धतेकडे जाऊ लागला आहे. त्यामुळे भविष्यात कोणीही साखर कारखान्यातील सहवीज निर्मिती प्रकल्पातील वीज खरेदी करणार नाही. त्यामुळे बगॅसचे करायचे काय? असा प्रश्न साखर उद्योगापुढे असेल.
साखर उद्योगाने बगॅसचा पर्यायी वापर कोठे करता येईल, याचा विचार सुरू करण्याची गरज असल्याचे मत अवस्थी यांनी व्यक्त केले आहे. ते म्हणाले, ‘मेक्सिकोमध्ये कोकाकोला कंपनीने एक नवे तंत्रज्ञान विकसित केले आहे. त्यात बगॅसच्या सहाय्याने बाटल्या तयार केल्या जातात. त्याचे विघटनही सहज शक्य आहे. जमिनीत पुरल्यास त्या बाटल्या सहा आठवड्यांत विघटीत होता.’ सध्याच्या घडीला प्लास्टिक हे खूपच धोकादायक बनले आहे. त्याचं विघटन अशक्य आहे. त्यामुळेच बगॅसच्या सहाय्याने आपण उत्पन्नाचा नवा मार्ग अवलंबला पाहिजे, असे मत अवस्थी यांनी व्यक्त केले.
भारतात, दर वर्षी ८०० लाख टन बगॅसची निर्मिती होते. महाराष्ट्रात कारखान्याच्या उत्पन्नाला हातभार लागावा म्हणून कारखान्यांनी सह वीज निर्मिती प्रकल्प उभारले आहेत. पण भविष्यात कारखान्यांसाठी बगॅसची विल्हेवाट लावणे कठीण जाणार आहे.