बागपत : ऊस थकबाकी न दिल्याने मलकपूर साखर कारखान्याच्या मालकांविरोधात दुसरा गुन्हा (एफआयआर) दाखल करण्याची तयारी सुरू केली आहे. तर पहिल्यांदा दाखल करण्यात आलेल्या प्रकरणात कारखान्याच्या मालकांविरोधात न्यायालयात आरोपपत्र सादर करण्यात आले आहे.
अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, खासदार डॉ. सत्यपाल सिंह यांच्यासमोर शेतकऱ्यांनी मलकपूर कारखान्याने थकीत बिले न दिल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. कारखान्याकडे साडेचारशे कोटी रुपयांची बिले थकीत आहेत. याबाबत एक वर्षापूर्वी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. तरीही बिले मिळालेली नाहीत. याबाबत खासदार सत्यपाल सिंह यांनी जिल्हाधिकाऱ्यांना कारवाई करण्याचे निर्देश दिले.
जिल्हाधिकारी जितेंद्र प्रताप सिंह यांनी सांगितले की, मलकपूर कारखान्याच्या विरोधात दाखल एफआयआरमध्ये आतापर्यंत न्यायालयात आरोपपत्र दाखल होवू शकले नव्हते. आता लवकरच पोलीस न्यायालयात मालकांच्या विरोधात आरोपपत्र दाखल करतील. याशिवाय, थकबाकी देण्यासाठी कारखान्याविरोधात आरसीसुद्धा जारी करण्यात आली आहे. त्यासाठी मुख्यालयाने परवानगी दिली आहे. कारखान्याविरोधात लवकर दुसरा गुन्हा दाखल केला जाणार आहे.