बागपत : डोंगराळ भागात संततधार पावसामुळे यमुना आणि हिंडन नदीखोऱ्यात अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. यामध्ये सुभानपूर, अब्दुलपुर, नूरपूर, संकरोड, माविकला, काठा, सर्फाबाद, ललियाना आदी गावांचा समावेश आहे. या गावात नदीकाठावरील ऊस पिकात पाणी साचल्याने पिक संकटात आले आहे. अनेक दिवसांपासून ऊस पाण्यात असल्याने त्याची मुळे कुजली आहेत. उसाची पानेसुद्धा पिवळी पडू लागली आहेत.
लाईव्ह हिंदूस्थानध्ये प्रकाशित वृत्तानुसार, अती पाण्यामुळे ऊस मोठ्या प्रमाणात कुजून उत्पादन कमी होईल, अशी भीती शेतकरी व्यक्त करत आहेत. छोट्या शेतकऱ्यांना याची सर्वाधिक धास्ती आहे. याबाबत कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. विकास मलिक यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले आहे. त्यांनी सांगितले की, पाण्यात बुडलेले ऊस पीक पाणी कमी होताच सुकण्यास सुरुवात होईल. ते थांबवण्यासाठी शेतात प्रती एकर १० किलो ब्लिचिंग पावडर फवारण्याची गरज आहे. याशिवाय, ३०० लिटर पाण्यात कॉपर ऑक्सीक्लोराईड मिसळून फवारणी करावी.
शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये दोन फवारण्या कराव्यात असा सल्ला देण्यात आला आहे. एनपीके आणि थायोफेनेट मिथाइल वापरुन पहिली फवारणी करावी. तर वापरा. दुसऱ्या फवारणीत सूक्ष्म अन्नद्रव्ये आणि इमिडाक्लोप्रिडचा वापर करावा अशी सूचना शेतकऱ्यांना केली आहे. या उपाय योजनेतून उसामध्ये पाणी साचणे व इतर प्रतिकूल परिस्थिती सहन करण्याची क्षमता विकसित होईल असे तज्ज्ञांनी सांगितले.