बहराईच : आयपीएल साखर कारखाना जरवलरोडचा गळीत हंगाम शुक्रवारी रात्री धार्मिक मंत्रोच्चार व पूजन करून समाप्त करण्यात आला. साखर कारखान्याने १०८ दिवस चाललेल्या हंगामात एकूण २४.४६ ला क्विंटल ऊस खरेदी केला. आपल्या उद्दीष्टापेक्षा तो ५ लाख क्विंटलने कमी आहे. आगामी हंगामात उद्दीष्टपूर्तीसाठी नव्या प्रजातीच्या उसाचे उच्चांकी उत्पादन करण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. कर्नाल, शहाजहाँपूर, हरियाणातील संशोधन केंद्रातून शेतकऱ्यांना बियाणे वितरण केले जात आहे.
इंडियन पोटॅश लिमिटेडच्या शुगर अँड केमिकल डिव्हिजन जरवलरोडने आपला गळीत हंगाम शुक्रवारी रात्री नऊ वाजता २४.४६ लाख टन ऊस खरेदी करून समाप्त केला. कारखान्याचा भोंगा वाजवून शेतकऱ्यांना हंगाम समाप्तीची माहिती देण्यात आली. तीन महिने १८ दिवसांत कारखान्याच्या गेटसह सहा खरेदी केंद्रांवरही अपेक्षित ऊस पुरवठा झाला नाही. चालू हंगामात ३० लाख क्विंटल ऊस खरेदीचे टार्गेट होते. कारखाना कार्यक्षेत्रात जरवलरोड सहकारी समिती आणि भुंभवा कार्यरत आहेत. त्यांच्या माध्यमातून एसएमएस प्रणाली शेतकऱ्यांमध्ये पसंतीची आहे. यावेळी कारखान्याचे प्रॉडक्शन हेड अरविंद देशवाल, गोपाल त्यागी, ए. के. चतुर्वेदी, ऊस विभागाध्यक्ष सी. पी. सिंग, आयटी मॅनेजर दीपक सिंह, रत्नेश तिवारी आदी उपस्थित होते. दरम्यान, ऊसावरील रोग तसेच पाणी साठण्याची समस्या सोडविण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे कारखान्याचे युनिट हेड टी. एस. राणा यांनी सांगितले.