बजाज ग्रुपला मिशन एनर्जी फाउंडेशनच्या वॉटर ऑप्टिमायझेशन अवॉर्ड्समध्ये जलसंवर्धनासाठी मिळाले ३ पुरस्कार

पणजी : बजाज ग्रुपला वीज प्रकल्पांसाठी मिशन एनर्जी फाउंडेशनच्या वॉटर ऑप्टिमायझेशन अवॉर्ड्समध्ये जलसंवर्धनासाठी ३ पुरस्कार देण्यात आले. गोवा येथे आयोजित मिशन एनर्जी फाउंडेशनने २०२५ च्या प्रतिष्ठित वॉटर ऑप्टिमायझेशन अवॉर्ड्समध्ये बजाज एनर्जी आणि ललितपूर पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड (एलपीजीसीएल) यांना जलसंवर्धनातील त्यांच्या उत्कृष्ट योगदानाबद्दल सन्मानित करण्यात आले आहे. मिशन एनर्जी फाउंडेशनतर्फे उत्कृष्ट जल व्यवस्थापन पद्धती राबविणाऱ्या संस्थांना सन्मानित करण्यात येते. बजाज ग्रुपच्या ललितपूर पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेडला ‘सर्वोत्कृष्ट झिरो लिक्विड डिस्चार्ज प्लांट ऑफ द इयर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर बजाज एनर्जी लिमिटेड (बीईएल)ला ‘सर्वोत्कृष्ट वॉटर रीयूज अँड रीसायकलिंग प्लांट ऑफ द इयर’ पुरस्कार मिळाला आहे. ही कामगिरी बजाज ग्रुपच्या शाश्वत पाणी व्यवस्थापन पद्धतींप्रती असलेल्या वचनबद्धतेचा पुरावा आहे.

माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू आणि पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाचे माजी संचालक आर. एन. जिंदाल यांनी बजाज ग्रुपचे मुख्य शाश्वतता अधिकारी डॉ. ए. व्ही. सिंग यांना हा पुरस्कार प्रदान केला. या कामगिरीबद्दल बोलताना डॉ. ए. व्ही. सिंह म्हणाले, जल संवर्धन आणि शाश्वत पद्धतींबद्दलच्या आमच्या प्रयत्नांना मान्यता देणारे हे प्रतिष्ठित पुरस्कार मिळाल्याने आम्हाला खूप आनंद होत आहे. बजाज ग्रुपमध्ये, आम्ही आमच्या सर्व कामकाजात पर्यावरणीय प्रभाव कमी करण्यासाठी आणि पर्यावरणपूरक पद्धतींना प्रोत्साहन देण्यासाठी वचनबद्ध आहोत. हे पुरस्कार आम्हाला शाश्वत भविष्यासाठी आमचे प्रयत्न सुरू ठेवण्यासाठी प्रेरणा देतात. वॉटर अ‍ॅडॉप्शन अवॉर्ड्स २०२५ ला आघाडीच्या संस्थांकडून १५० हून अधिक नामांकने मिळाली, त्यापैकी फक्त ५० संस्थांचीच पुरस्कारांसाठी निवड झाली. हा पुरस्कार जलसंपत्तीचे संवर्धन आणि शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी बजाज एनर्जी आणि एलपीजीसीएलच्या समर्पणाची पुष्टी करतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here