बजाजच्या साखर कारखान्यांकडून शेतकर्‍यांचे 10 हजार करोड देय

मुंबई/लखनऊ : एका कार्यक्रमात उद्योजक राहुल बजाज यांनी गृहमंत्री अमित शाह यांना सांगितले की, जनता सरकारची तक्रार करण्यास घाबरते . अमित शाह यांनी त्यांच्या आशंका फेटाळल्या आणि सांगितले की, त्यांना वाटणारी भिती निराधार आहे. विरोधी नेत्यांनी भाजपाला निशाणा बनवण्यासाठी बजाज यांच्या विधानाचा वापर केला. यामध्ये त्यांनी राहुल गांधींचे कौतुक केले, त्यामुळेच या वेळेचे त्यांच्यावरचे आरोप खूपच गंभीर आहेत.

लखीमपूर खिरी येथून भाजपा संसद सदस्य अजय मिश्रा यांनी महत्वाचे खुलासे केले. उत्तर प्रदेशातील लखीमपूर खीरी परिसर जो नेपाळच्या अगदी जवळ आहे, आणि हा परिसर ऊसाच्या उत्पादनासाठी ओळखला जातो. जिथे 10 मोठे साखर कारखाने आहेत, ज्यातील 3 कारखाने बजाज परिवाराचे आहेत. त्यांनी एक आश्‍चर्यजनक खुलासा केला आहे की, बजाज परिवाराचे स्वामित्व असणार्‍या साखर कारखान्यांवर गेल्या दोन वर्षांपासून ऊस शेतकर्‍यांची जवळपास 10,000 करोड रुपयांची देणी आहेत. राहुल बजाज राज्यसभेचे सदस्य राहिले आहेत. ज्यावेळी मिश्रा यांनी बजाज यांच्यावर बोलायला सुरुवात केली, त्यावेळी विरोधी नेत्यांनी आरडाओरड करायला सुरुवात केली. मिश्रा यांनी सांगितले की, जर विरोधी पक्ष बजाज यांचे नाव वापरुन भाजपावर आरोप करु शकतात तर त्यांचे नावही घेवू शकतात. काही लोकांनी म्हटले की, 10,000 करोड रुपयांच्या थकबाकीमुळे राहुल बजाज घाबरत आहेत.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here