अगस्ती साखर कारखान्याच्या संचालक पदी बाळासाहेब नाईकवाडी बिनविरोध

अहिल्यानगर :अगस्ती सहकारी साखर कारखान्याच्या संचालकपदी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब नाईकवाडी यांची बिनविरोध निवड करण्यात आली.कारखान्याच्या इतर मागास प्रवर्गातील जागा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मिनानाथ पांडे यांच्या निधनाने रिक्त झाली होती.त्यामुळे या रिक्त झालेल्या जागेवर काँगेस पक्षाकडून नाव मागविण्यात आले.काँगेस पक्षाने अध्यक्ष सीताराम गायकर यांची भेट घेऊन पक्षनेते व शिष्टमंडळाशी चर्चा करून नाईकवाडी यांचे नाव सुचवले.अध्यक्ष गायकर, उपाध्यक्ष सुनिताताई भांगरे व संचालक मंडळाच्या बैठकीत या नावावर शिक्कमोर्तब करण्यात आले.

बाळासाहेब नाईकवाडी हे काँगेस पक्षाचे तालुका कार्याध्यक्ष म्हणून कार्यरत असून त्यांनी यापूर्वीही कारखान्याचे संचालक पद भूषविले आहे. संचालक पदासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली.नाईकवाडी यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने त्यांची निवड बिनविरोध झाल्याचे निवडणूक निबंधक गणेश पुरी यांनी जाहीर केले.सहाय्यक अधिकारी अमोल वाघमारे उपस्थित होते. निवडीनंतर नाईकवाडी समर्थकांसह काँग्रेस कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून आनंदोत्सव केला.कारखान्याच्या उपाध्यक्ष सुनिताताई भांगरे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.ज्येष्ठ नेते दादा पाटील वाकचौरे, शिवाजीराव नेहे, संपतराव कानवडे, सोन्याबापू वाकचौरे, प्रा.बाळासाहेब शेटे, विक्रम नवले, संतोष देठे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here