लखनौ : उसाचे जादा गाळप आणि इथेनॉल उत्पादनामुळे बलरामपूर शुगर मिल्सला (बीसीएमएल) यावर्षी व्यवसायात चांगल्या वाढीची अपेक्षा आहे. बलरामपूर शुगर मिल्सने २०२२-२३ मध्ये ९३.६६ लाख टन उसाचे गाळप केले होते. या हंगामात गाळपामध्ये सुमारे १० टक्के वाढ अपेक्षित आहे. कंपनी डिजिटायझेशन आणि ऑटोमेशनवर मोठी गुंतवणूक करीत आहे.
कोलकातामध्ये मुख्यालय असलेल्या बीसीएमएलने या आर्थिक वर्षात बिहारच्या कुंभीमध्ये आपल्या युनिटचा विस्तार करून सध्याची ८,००० टीसीडी क्षमता १०,००० टन ऊस प्रतीदिन करण्यासाठी १००० कोटी रुपयांची गुंतवणूक करू इच्छित आहे. बलरामपूर शुगर्सचे अध्यक्ष आणि कार्यकारी संचालक विवेक सरावगी यांच्या म्हणण्यानुसार, कंपनीने गेल्या आर्थिक वर्षादरम्यान उत्पादन वाढविण्यासाठी १,००० कोटी रुपये खर्च केले आहेत. आणि भांडवली खर्चाचा एक महत्त्वपूर्ण भाग ऑटोमेशन आणि त्याच्या दोन युनिट्समधील ऑपरेशन्समध्ये सुरक्षितता वाढविण्यासाठी खर्च करण्यात आला आहे. त्यामुळे ऊस गाळपातील उच्च कार्यक्षमता आणि अधिक स्थिरता प्राप्त झाली.
सरावगी यांनी बिझनेस लाइनला सांगितले की, आम्ही उसाच्या विविधतेसाठी, रोगापासूनच बचावासाठी सर्वोत्तम कृषी पद्धती आणण्यााठी उसाच्या आघाडीवर खूप काम करीत आहोत. या वर्षातील एकूण साखर उत्पादनावर भाष्य करणे अद्याप घाईचे असले तरी, चालू हंगामातील २०२३-२४ मध्ये देशातील साखरेचे उत्पादन ३२-३४ दशलक्ष टनांच्या जवळपास राहण्याची शक्यता आहे. हे उत्पादन गेल्या वर्षीच्या स्तरा इतकेच आहे.
इथेनॉल उत्पादनात वाढीसाठी प्रयत्न
बलरामपूर शुगर्सची डिस्टलरी क्षमता जवळपास १०५० किलो लिटर प्रती दिन आहे. देशातील एकूण उत्पादन क्षमतेच्या जवळपाच पाच टक्के आणि उत्तर प्रदेशच्या उत्पादनाच्या ३० टक्के हे प्रमाण आहे. कंपनीने FY२३ मध्ये १७.०९ कोटी लिटर इथेनॉलचा पुरवठा केला आहे. क्षमता विस्तार आणि ओएमसींसोबत उच्च करारानंतर इथेनॉल पुरवठ्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
ते म्हणाले की,
उन्होंने कहा, आम्ही देशांतर्गत इथेनॉलचे सर्वात मोठे पुरवठादार आहोत आणि आम्ही असेच राहू अशी आशा करतो. प्रत्येक हंगामात ३५० दशलक्ष लिटर इथेनॉल तयार करण्याची आमची क्षमता आहे. आम्ही पुढील वर्षी इथेनॉल कार्यक्रमासाठी ३०० दशलक्ष लिटरपेक्षा जास्त पुरवठा करण्याची अपेक्षा करतो. कंपनीच्या एकूण व्यवसायात डिस्टिलरी सेगमेंटचे योगदान २१ टक्के होते. ३१ मार्च २०२३ अखेर ते ४६६६ कोटी रुपयांचे आहे. पुढील काळात डिस्टिलरी सेगमेंटचे एकूण महसुलातील योगदान ३५ टक्क्यांवर पोहोचण्याची अपेक्षा आहे.
सरावगी म्हणाले की, बीसीएमएलने गेल्या तीन वर्षात २,५०,००० वृक्ष लावले आहेत. आणि पुढील पाच वर्षात १०,००,००० झाडे लावण्याची अपेक्षा आहे. गेल्या पाच वर्षात कंपनीतील कचऱ्यामध्ये १० टक्के घट केली आहे. तर पाण्याच्या कचऱ्याचे उत्सर्जन २४ टक्क्यांनी घटले आहे. या व्यतिरिक्त, कंपनीचा नूतनीकरणीय ऊर्जेचा वापर एकूण व्युत्पन्न झालेल्या विजेच्या टक्केवारीत वाढला आहे. त्यामुळे जीवाश्म इंधनावरील त्याचे अवलंबित्व कमी झाले आहे.