बलरामपूर शुगरचा तिसऱ्या तिमाहीचा नफा २३ टक्क्यांनी घसरून आला ७०.४७ कोटींवर

मुंबई : बलरामपूर चिनी मिल्स लिमिटेड (बीसीएमएल) ने ३१ डिसेंबर २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीत आपल्या निव्वळ नफ्यात २२.८३ टक्क्यांनी घट नोंदवली आहे. निव्वळ नफा ७०.४७ कोटी रुपये झाला आहे. बाजाराच्या नियामकांकडील फाइलिंगनुसार, कंपनीचा मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत निव्वळ नफा ९१.३२ कोटी रुपये होता. बीसीएमएलच्या कामकाजातून मिळणारा महसूलही ३.१० टक्क्यांनी घसरून १,१९२.१४ कोटी रुपयांवर आला आहे. गेल्यावर्षी समान कालावधीत महसूल १,२३०.३८ कोटी रुपये होता.

बीसीएमएल ही भारतातील सर्वात मोठ्या, एकीकृत साखर कंपन्यांपैकी एक आहे. कंपनीच्या संलग्न व्यवसायांमध्ये डिस्टिलरी व्यवस्थापन आणि सहवीज निर्मितीचा समावेश आहे. कंपनीचे सध्या उत्तर प्रदेशात दहा साखर कारखाने आहेत. त्यांची एकूण ऊस गाळप क्षमता ८०,००० टीसीडी आहे, डिस्टिलरी आणि सहवीज निर्मिती कार्ये अनुक्रमे १०५० केएलपीडी आणि १७५.७ मेगावॅट (विक्रीयोग्य) आहे. बीसीएमएल ८०,००० टीपीए क्षमतेचा भारतातील पहिला पॉली लॅक्टिक अॅसिड (पीएलए) प्लांट उभारण्याच्या प्रयत्नात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here