वॉशिंग्टन: जीवाश्म इंधन बदलण्यासाठी परिस्थितीनुरूप अनुकूल अक्षय ऊर्जेचा स्रोत शोधताना संशोधकांना बांबू हा समाधानकारक पर्याय असल्याचे दिसून आले आहे. यााबबत ‘जीसीबी बायोएनर्जी’ या संशोधन पत्रिकेत एक संशोधन प्रसिद्ध झाले आहे. अभ्यासकांच्या म्हणण्यानुसार, बांबूची वाढ गतीने होते. तो कार्बन डाय ऑक्साइड जास्त सोडतो आणि हवेत ऑक्सिजनचे अधिक प्रसारण करते. त्यातून अनेक प्रक्रियांची रुपरेखा तयार केली जाते. त्यामुळे बांबू या कच्च्या मालाचा वापर बायोइथेनॉल, बायोगॅस आणि अन्य बायोएनर्जी उत्पादनांमध्ये, जसे की किण्वन प्रक्किया आणि पायरोलिसिसमध्ये बदलण्यासाठी केला जाऊ शकतो.
संशोधकांनी ऊर्जा प्रणाली आणि ऊर्जा मूल्यवर्धित तंत्रज्ञानामध्ये बांबूवर्गीय घटकांच्या संभाव्य वापराचा शोध लावला आहे. हंगेरियन युनिव्हर्सिटी ऑफ ॲग्रीकल्चर अँड लाइफ सायन्सचे आधीचे लेखक झिवेग लियांग यांनी म्हटले आहे की, आम्ही बांबू बायोमाससाठी ऊर्जा रुपांतरण पद्धतीचा आढावा घेतला आहे. त्यामध्ये असे आढळून आले आहे की, बायोइथेनॉल बायोचारपासून मिळणारी प्राथमिक उत्पादने आहेत.
जीवेई लियांग यांनी सांगितले की, बांबूची रासायनिक संरचना विविध प्रजातींमध्ये भिन्न असते. त्यामुळे भविष्यातील संशोधन संशोधन प्रयत्नांसाठी बायोमाससाठीचा वेळ आणि खर्च कमी करण्यासाठी फायदेशीर प्रजाती निवडण्यासाठी परिमाणात्मक डेटा मिळवावा लागेल. यासासाठी अधिक व्यापक माहितीवर लक्ष केंद्रित केले पाहिजे.