नवी दिल्ली : देशात पुढील हंगामात साखर निर्यातीबाबतची अनिश्चितता गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू आहे. मात्र प्रसार माध्यमांच्या रिपोर्टनुसार, सरकार साखर निर्यातीवरील निर्बंध पुढच्या वर्षीही सुरु ठेवू शकते. CNBC-TV18 ने दिलेल्या वृत्तानुसार, सरकारी सुत्रांच्या म्हणण्यानुसार पुढील कालावधीसाठीही साखर निर्यातीवरील निर्बंध सुरूच राहतील.
सध्याच्या हंगामात सरकारने कर्नाटक आणि महाराष्ट्रातील कमी साखर उत्पादनाच्या अंदाजामुळे साखरेच्या निर्यातीवर निर्बंध लागू केले. साखर उद्योगातील अनेक संघटनांच्या म्हणण्यानुसार, पुढील हंगामात साखर पुरेशा प्रमाणात उपलब्ध होईल, त्यामुळे सरकारने साखर निर्यातीला परवानगी दिली पाहिजे. भारताच्या चालू हंगामातील आंतरराष्ट्रीय बाजारातील अनुपस्थितीमुळे ब्राझीलला खूप फायदा मिळाला आहे.