इजिप्त कडून तीन महिन्यांसाठी साखर आयातीवर प्रतिबंध

कैरो : घरगुती साखर उद्योगाला दिलासा देण्यासाठी इजिप्तच्या व्यापार आणि उद्योग मंत्री निवेन गेमे यांनी गुरुवारी तीन महिन्यांसाठी पांढऱ्या आणि कच्च्या साखर आयातीवर प्रतिबंध घालण्याचा निर्णय घेतला. जी साखर फार्मास्यूटिकल्स उत्पादनासाठी आयात केली जाते, तिला आयात प्रतिबंधातून वगळले आहे, पण त्या आयातीसाठी सशर्त स्वास्थ्य मंत्रालयाची मंजूरी गरजेची आहे. मंत्रालयाने सांगितले की, कच्ची साखर आयातीची परवानगी केवळ व्यापार आणि उद्योग मंत्रालयांचे अनुमोदन असेल तरच दिली जाईल.

गेमे यांनी सांगितले की, जागतिक साखरेच्या दरातील चढ उतारामुळे राष्ट्रीय उद्योगाच्या रक्षणाच्या उद्देशातून पुरवठा आणि आंतरिक व्यापार मंत्रालयाच्या समन्वयाने आदेश जारी केला गेला होता. विशेष रूपात जागतिक मंदीमुळे कच्चे तेल आणि साखरेच्या किमतीत घट झाली होती. गेमे यांनी सांगितले की, कोरोना वायरस ने मिस्र च्या राष्ट्रीय उद्योगाचे मोठे नुकसान केले आहे. पुरवठा आणि अंतर्गत व्यापार मंत्री अली मोसेली यांनी सांगितले की, गेल्या अवधीत साखरेच्या आयातीत वृध्दी झाली होती, जी ओवरस्टॉकिंग चे कारण बनली. त्यांनी सांगितले की, इजिप्त चा एकूण साखरेचा वापर वार्षिक 3.2 मिलियन टन पर्यंत पोचतो, ज्यामध्ये घरगुती स्वरूपात 2.4 मिलियन टन इतके उत्पादन सामिल आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here