शाळांमध्ये साखर पेयावर प्रतिबंध घातल्यास जमैका साखर उद्योगावर होणार नकारात्मक परिणाम

जमैका : जमैका एग्रीकल्चर  सोसायटी (जेएएस) चे अध्यक्ष लेनवर्थ फुल्टन हे स्थानिक साखर उद्योगाची सद्य स्थिती पाहून चिंतेत आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, साखर कारखाने कमी होत आहेत. ते म्हणाले की, जेव्हा मी अहवाल पाहतो, तेव्हा असे दिसते की, 1940 मध्ये 140 पेक्षा अधिक साखर कारखाने होते. 1980 मध्ये जवळपास 15 होते. आज केवळ तीन आहेत. हे निश्‍चित रुपात नकारात्मक संकेत आहेत.

शाळांमध्ये साखरपेयावर प्रतिबंध घालण्यासंदर्भात फुल्टन म्हणाले की, यामुळे साखर उद्योगावर  नकारात्मक परिणाम होईल. त्यांनी सांगितले की, याचा अधिक वापर चांगला नाही आणि आरोग्यावर परिणाम करणारा आहे. दरम्यान, सरकारने सेंट एलिजाबेथ मध्ये सेंट कैथरीन आणि एपलटन एस्टेट मध्ये वर्थ पार्क एस्टेट व क्लेंरेंडन मध्ये मॉनमस्क येथून ऊस वाहतुकीसाठी अतिरिक्त 200 मिलियन डॉलर देत आहे. ही मदत 2019-2020 च्या पीकासाठी आहे. 2018-2019 च्या पीकासाठी समान मूल्य दिले गेले होते.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here