पटना : हिंद मजूर सभा बिहार ने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून आग्रह केला आहे की, राज्यामध्ये बंद पडलेले साखर कारखाने सुरु केले जावेत, यामुळे जवळपास 25 हजारपेक्षा अधिक मजूरांना प्रत्यक्ष आणि दोन लाख मजूरांना अप्रत्यक्ष रुपात रोजगार मिळेल. याशिवाय 25 लाख शेतकर्यांनाही याचा फायदा होईल. तसेच बंद साखर कारखाने सुरु झाल्यास मजूरांचे वेतन आणि शेतकर्यांची ऊसाची थकबाकी भागवली जाईल.
हिंद मजूर सभेचे महामंत्री अघनू यादव यांनी सांगितले की, लोहत, सकरी, रैयाम आणि समस्तीपूर येथील साखर कारखान्यांना सुरु करावे. हे उद्योग विकासाचे खरे चलन आहे. कित्येक यूनिटमध्ये मजूरांना पैसे तर दिले आहेत, पण भविष्य निधी भागवला नसल्याने त्यांना पेन्शन मिळत नाही. यामुळे या यासंदर्भात आवश्यक आदेश दिले जावेत. त्यांनी सांगितले की, राज्य सरकारने साखर कारखान्याच्या मजूरांच्या समस्त देणेकर्यांचे पैसे भागवण्यासाठी 162 करोड रुपये दिले होते. सर्व जिल्ह्यामध्ये पैसे भागवण्यात आले आहेत , पण मधुबनी जिल्ह्यात लोहत साखर कारखान्याचे पैसे भागवलेले नाहीत. त्यांनी सरकारला सांगितले आहे की, या सार्याचा विचार करुन मजूरांच्या समस्या सोडवाव्यात.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.