वाहतूकदारांचे चालू असलेले ‘चक्काजाम’ आंदोलन आणि मराठा समाजाचा ‘मराठा आरक्षण मोर्चा’ या दोन्ही आंदोलनाला पाठींबा देण्याकरिता कामगारांनी देखील बंद पुकारला.
वाहतूकदारांनी २० जुलैपासून विविध मागण्यांकरिता बेमुदत बंद व चक्काजाम आंदोलन सुरु केले आहे तसेच मराठा समाजाचे आरक्षण मिळविण्याकरिता सुरु असलेले आंदोलन याचे चांगलेच पडसाद आपल्याला दिसून येत आहेत. या दोन्ही आंदोलनाच्या पाश्ववभूमीवरच आज माथाडी कामगारांनी देखील बंद पुकारला होता.
“वाहतूकदारांनी पुकारलेले बेमुदत चक्काजाम आंदोलन व मराठा समाजाचे आरक्षणासाठी सुरु असलेले आंदोलन या दोन्ही संघटनेना पाठिंबा दर्शविण्यासाठी आज माथाडी कामगारांनी देखील बंद पुकारला होता,” असे ‘महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन’च्या सूत्रांनी सांगितले.