ढाका : बांगलादेश व्यापार महामंडळाकडून (टीसीबी) ऑगस्ट महिन्यात एक कोटी कार्डधारकांना साखर, डाळ, सोयाबीन तेल आणि कांद्यासह दैनंदिन जीवनावश्यक वस्तू सवलतीच्या दरात दिल्या जाणार आहेत.
यासंदर्भात टीसीबीने ३१ जुलै २०२२ रोजी एक प्रसिद्धी पत्रक जारी केले आहे. यामध्ये म्हटले आहे की, ही विक्री १ ऑगस्टपासून डिलर्सची दुकाने, महामंडळ आणि जिल्हा तसेच उपजिल्हा स्तरावरी प्रशासनाच्या सहकार्यातून टीसीबीने निश्चित केलेल्या केंद्रावर सुरू होणार आहेत. या योजनेअंतर्गत प्रत्येक कार्डधारकाला एक किलो साखर टीके ५५ या दराने मिळेल. तसेच दोन दिलट सोयाबीन तेल टीके ११० प्रती लिटर या दराने विक्री केले जाणार आहे. मात्र, योजनेत जाहीर केलेला कांदा केवळ महानगरांमध्ये तसेच टीसीबीच्या विभागीय कार्यालये असलेल्या जिल्ह्यांमध्येही उपलब्ध होऊ शकेल असे टीसीबीच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे.