बांगलादेश : साखर उत्पादन वाढविण्यासाठी करणार Tk१,००० कोटींची गुंतवणूक

ढाका : बांगलादेशातील अग्रेसर साखर उत्पादक कंपनी देशबंधु शुगर मिल्स लिमिटेडने वाढती देशांतर्गत गरज भागविण्यासाठी आपली उत्पादन क्षमता दुप्पट करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी कंपनीकडून Tk१,००० कोटींची गुंतवणूक करण्यात येणार आहे. कंपनीने विस्ताराच्या आपल्या योजनेच्या अर्थ पुरवठ्यासाठी शेअर बाजारातून Tk १०० कोटी रुपये उभारण्याची योजना तयार केली आहे. कंपनीने आधीपासूनच सिटी बँक कॅपिटल रिसोर्सेज लिमिटेडला आयपीओसाठी कॉर्पोरेट सल्लागार आणि योजना व्यवस्थापक म्हणून नियुक्त केले आहे. समुहाचे निवासी संचालक इंजिनीअर एबीएम अरशद हुसेन यांनी सांगितले की, आता आम्ही युरोपिय बाजारातून Tk१,००० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीने अत्याधुनिक मशिनरी खरेदी करू इच्छितो.

ते म्हणाले की, विनिमय दरात उतार-चढाव असल्याने या योजनेच्या एकूण खर्चाला आता अंतिम रुप देण्यात येत आहे. हुसेन म्हणाले की, २०२२ मध्ये कारखान्यांचे आधुनिकीकरण करण्यासाठी आधीच जवळपास Tk१०० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here