बांगलादेश : १५ पैकी १४ सरकारी साखर कारखान्याने तोट्यात

ढाका : सरकारकडून चालविल्या जाणाऱ्या १५ साखर कारखान्यांपैकी केवळ एकमेव कारखाना नफ्यात सुरू आहे, अशी माहिती बांगलादेशचे उद्योग मंत्री नुरुल मजीद महमूद हुमायूँ यांनी दिली. इतर सर्व कारखाने तोट्यात सुरू आहेत असे ते म्हणाले. मंत्री नुरूल मजीद महमुद हुमायूँ हे संसदेत खासदार अली आजम यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाच्या उत्तरात बोलत होते.

उद्योग मंत्री नुरूल मजीद महमुद हुमायूँ यांनी सांगितले की, सरकारच्या स्वामित्वाखालील साखर कारखाना केयरव अँड कंपनी फायद्यात आहे. तोट्यात सुरू असलेले सहा साखर कारखान्यांतील ऊस गाळप बंद करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. वाढत्या तोट्यामुळे डिसेंबर २०२० पासून पबना, श्यामपूर, सेताबगंज, कुश्तिया, पंचगढ आणि रंगपूर येथे उत्पादन बंद आहे. सरकारी साखर कारखाने बंद पडल्याने ऊस उत्पादकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here