ढाका: बांग्लादेश साखर आणि खाद्य उद्योग निगम अंतर्गत 15 कारखान्यांपैकी 9 कारखाने 10 डिसेंबर पासून ऊसाचे गाळप सुरु करेल. मंत्रलयाच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला. उद्योग मंत्रालयानुसार, बाकीचे सहा कारखाने आधुनिकीकरण आणि मालाच्या विविधीकरण परियोजनेच्या कार्यान्वयनासाठी पुढच्या सूचनेपर्यंत बंद राहतील. अंतर मंत्रालय बैठकीच्या अध्यक्षस्थानी उद्योग मंत्री नुरुल माजिद महमूद हुमायूँ खान होते. गृहमंत्री असदुज्जमां खान, उद्योग राज्यमंत्री कमाल अहमद मजुमदार, श्रम आणि रोजगार राज्य मंत्री बेगम मोनुजन सूफियान आणि संबंधीत निर्वाचन क्षेत्रातील संसद सदस्य उपस्थित होते.
बांग्लादेश साखर आणि खाद्य उद्योग निगम, थाई एक्सिम बँक आणि जापान बँक फाँर इंटरनॅशनल कोऑपरेशन आणि थाईलंड स्थित सुतेक इंजीनियरींग कंपनीचे विशेषज्ञांच्या गुंतवणुकीबरोबरच एका संयुक्त उद्यमाच्या माध्यमातून परियोजना लागू करेल. दोन्ही बँकांनी सरकारी साखर कारखान्यांवर व्यवहार्यता अध्ययन सुरु केले आहे. नव्या योजनेनुसार, बीएसएफआयसी डिस्लिरीमध्ये साखर उत्पादनासह अल्कोहोल, जैव उर्वरक आणि विजेचे उत्पादन होईल. पाबना साखर कारखाना कर्मचारी यूनियन चे महासचिव एमडी अशरफुज्जमान उजल यांनी सांगितले की, जर कारखाना सुरु नसेल, तर शेतकरी आपला उस कुठे विकणार, कारण हे खाद्यान्न प्रमाणे नाही, ज्याला कुठेही विकले जावू शकते. त्यांनी सांगितले की, ते 15 डिसेंबर पर्यंत आपल्या मागणीबाबत आंदोलन करतील. त्यांच्या नुसार, देशाच्या उत्तरी भागात कमीत कमी 2 लाख उस शेतकरी आहेत.