ढाका : रमजानपूर्वी खाद्यतेल, साखर आणि खजूरच्या आयातीवरील शुल्क कमी करण्याची शिफारस वाणिज्य मंत्रालयाने राष्ट्रीय महसूल मंडळाला केली आहे. रविवारी वाणिज्य मंत्रालयात पाच मंत्रालयांच्या संयुक्त बैठकीनंतर सोमवारी या संदर्भातील पत्र एनबीआरला पाठवण्यात आले.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, एनबीआरच्या अधिकाऱ्याने सांगितले की, त्यांना वाणिज्य मंत्रालयाकडून आयात शुल्क कमी करण्याबाबत एक पत्र प्राप्त झाले आहे. ते याबाबत गुरुवारी (दि. २५ जानेवारी, २०२४) या संदर्भात बैठक घेणार आहेत. मंत्रालयाचे माहिती आणि जनसंपर्क अधिकारी, एमडी हैदर अली यांनी जागो न्यूजला सांगितले की, रमजानपूर्वी खाद्यतेल, साखर आणि खजूरच्या आयातीवरील शुल्कात कपात करण्याची शिफारस करणारे पत्र एनबीआरला पाठवण्यात आले आहे. परंतु शुल्क किती कमी होईल? दर काय असतील, याचा निर्णय त्यांच्याकडूनच घेतला जाईल.