बांगलादेश : दर्शना साखर कारखाना २५ नोव्हेंबरपासून साखर उत्पादन करणार

चौडंगा : जिल्ह्यातील दर्शना साखर कारखान्यात २५ नोव्हेंबर २०२४ पासून हंगामी उत्पादन सुरू होणार आहे. कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक के. एम. अर्शद उद्दीन यांनी शुक्रवारी बैठकीनंतर ही माहिती दिली. या बैठकीला कारखान्याचे उच्चपदस्थ अधिकारी व शुगरकेन वेल्फेअर सोसायटीचे नेते, कामगार संघटनेचे नेते, कारखान्याचे प्रादेशिक प्रमुख आणि कारखाना परिसरातील प्रमुख ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

दर्शना साखर कारखान्याच्या व्यवस्थापनाने या हंगामात एक लाख टन उसाचे गाळप करून सात हजार टन साखर उत्पादनाचे उद्दिष्ट ठेवले आहे. या हंगामात साखरेच्या उताऱ्याची टक्केवारी सात टक्के निश्चित करण्यात आली आहे. सध्या कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील ७,६२० एकर क्षेत्रात गाळपासाठी ऊस उपलब्ध आहे. या हंगामात कारखान्यामध्ये गाळप होण्यासाठी चांगल्या प्रमाणात ऊस उपलब्ध आहे. कारखाना व्यवस्थापनाच्या सूत्रानुसार, चालू उत्पादन हंगामात कारखाने साधारणतः १०० दिवस कामकाज करतील अशी शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here