ढाका : राज्य सरकारच्या स्वामित्वाखाली असलेले सर्व २५ ज्यूट कारखाने पुन्हा सुरू करण्यासह सहा सरकारी साखर कारखान्यांचे संचालन पुन्हा करण्याची मागणी श्रमिक कर्मचारी ओइक्या परिषदेने सरकारकडे केली आहे.
संघटनेच्या नेत्यांनी ढाका येथे नॅशनल प्रेस क्लबसमोर आयोजित एका रॅलीद्वारे आपल्या मागण्या मांडल्या. या रॅलीमध्ये बोलताना उपस्थित नेत्यांनी सांगितले की, सरकारने भ्रष्ट नोकरशहांच्या शिफारसींमुळे २५ ज्यूट कारखाने बंद केले आहेत. त्यामुळे ५०००० हून अधिक कुटूंबे आर्थिक संकटात गेली आहेत. केवळ १२०० कोटी रुपये खर्च करून या कारखान्यांचे आधुनिकीकरण करणे शक्य आहे. हे कारखाने लगेच नफ्यात येऊ शकतील असे त्यांनी सांगितले.
याशिवाय, सरकारने सहा साखर कारखान्यांना गाळप करण्यास बंदी घातली आहे. सरकारने हे कारखाने बंद करून भ्रष्टाचाऱ्यांना प्रोत्साहनच दिल्याचा आरोप नेत्यांनी यावेळी केला.