बांगलादेश: साखर आयात शुल्क मागे घेण्याचा निर्णय

ढाका : बांगलादेशच्या राष्ट्रीय महसूल बोर्डाने (एनबीआर) ग्राहकांना कमी दरात साखर उपलब्ध व्हावी यासाठी कच्ची आणि प्रक्रिया केलेल्या साखरेवरील आयात शुल्क मागे घेण्यात आले आहे.

याबाबत जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेत NBR ने तत्काळ प्रभावाने कच्ची साखर आयातीवर ३,००० टका (जवळपास $२८) विशिष्ट शुल्क आणि प्रती टन रिफाईंड साखरेवर ६,००० टका कर मागे घेण्यात आला आहे. याशिवाय एनबीआरने साखरेच्या आयातीवरील नियामक शुल्क ३० टक्क्यांवरुन घटवून २५ टक्के केले आहे. हा निर्णय या वर्षी ३० मे पर्यंत प्रभावी राहिल. एनबीआयच्या एका अनुमानानुसार, नव्या शुल्कामधील सुट आणि कमी केलेल्या उपायानंतर कच्च्या तसेच रिफाईंड साखरेच्या एकूण आयातीमधील खर्च अनुक्रमे ६,५०० टका आणि ९,००० टका प्रती टन घटतील अशी अपेक्षा आहे. ($१ जवळपास १०६ टका आहे.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here