बांगलादेश : साखरेसह पाम तेलाच्या दरात सरकारकडून कपात

ढाका : बांगलादेश व्यापार आणि शुल्क आयोगाच्या (बीटीटीसी) शिफारशीनंतर वाणिज्य मंत्रालयाने साखर आणि पामतेलाच्या दरात कपात केली आहे. पॅकबंद आणि लूज साखरेच्या दरात अनुक्रमे ६ रुपये आणि ८ रुपये प्रती किलो कपात करण्यात आली आहे. तर पाम तेलाचे दर १२ रुपये प्रती लिटरने घटवण्यात आले आहेत. या दर कपातीनंतर पाम तेल आता १३३ रुपये प्रती लिटर या दराने मिळणार आहे. ही दरकपात २५ सप्टेंबरपासून लागू होईल,असे मंत्रालयाने जाहीर केले आहे.

बीटीटीसीच्या शिफारशीनंतर पॅकबंद साखरेचे दर ९५ रुपयांवरून ८९ रुपयांवर आणण्यात आले आहेत. तर लूज साखरेचा दर ९२ रुपयांवरून ८४ रुपयांवर आला. मात्र बाजारात जादा दराने त्याची विक्री केली जात असल्याचा आक्षेप होता.
टीबीएस न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, जागतिक बाजारपेठेतील किमती आणि आयात खर्च यांची सांगड घालून यापूर्वी बांगलादेश व्यापार आणि शुल्क आयोगाने (बीटीटीसी) यापूर्वी वस्तूंचे दर निश्चित केले होते. त्यानुसार पाम तेलाची किंमत १३३ रुपये प्रती लिटर ठेवण्यात आली होती. वाणिज्य मंत्रालयाने यापूर्वी ३० ऑगस्ट रोजी साखर, पाम तेलासह तांदूळ, आटा, मैदा, सोयाबीन तेल, पाम तेल, मसूर आणि सिमेंटच्या किमती निश्चित करण्याची घोषणा केली होती. सद्यस्थितीत सोयाबीन तेलाचा दर वाजवी असल्याचे आयोगाचे मत आहे. दरम्यान, बीटीटीसीच्या शिफारशीपेक्षा जास्त दराने साखर व पामतेलाची विक्री सुरू होती. ट्रेडिंग कॉर्पोरेशन ऑफ बांग्लादेश (टीसीबी) च्या म्हणण्यानुसार, किरकोळ बाजारात साखर ९० ते ९५ रुपये प्रती किलो दराने विकली जात होती. तर पामतेल १४५ ते १५० रुपये प्रती लिटर आणि सोयाबीन तेल १८५ ते १९२ रुपये प्रती लिटर दराने मिळत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here