ढाका: सरकारने राज्यांच्या मालकीचे साखर कारखाने बंद करण्याचा कोणताही निर्णय घेतलेला नाही, असे स्पष्टीकरण बांग्लादेशचे उद्योगमंत्री नुरूल माजिक महमूद हुमायूँ यांनी संसदेत दिले. मात्र, एकूण १५ पैकी सहा कारखान्यांचे गळीत या हंगामात बंद असल्याचे त्यांनी सांगितले. अवामी लीगचे संसद सदस्य अली आजम यांच्या प्रश्नांना उत्तरे देताना ते बोलत होते. कोणताही साखर कारखाना बंद झालेला नाही. कारखाने बंद करण्याचा निर्णय झालेला नाही असे ते म्हणाले.
बांग्लादेशमध्ये साखर आणि अन्न, उद्योग महामंडळाअंतर्गत (बीएसएफआयसी) १५ साखर कारखाने आहेत. याबाबत उद्योगमंत्र्यांनी संसदेत सांगितले की, १५ पैकी केवळ एकच साखर कारखाना कैरव अँड कंपनी लिमिटेड (बीडी) फायद्यात आहे. मात्र, अन्य १४ कारखाने नुकसानीत आहेत.
मंत्री नुरुल माजिद महमूद हुमायूँ म्हणाले, सरकारने देशातील साखर उद्योगाला वाचविण्यासाठी कारखान्यांच्या आधुनिकीकरणाची गरज आहे. त्यासाठी सरकार दोन विकास योजना राबविणार आहे. साखर कारखान्यांच्या आधुनिकीकरण आणि पर्यावरणाला अनुकूल बनविण्यासाठी दोन योजनांना बीएसएफआयसीकडून कार्यान्वित केले जाणार आहे.