ढाका : बांग्लादेशामध्येही ऊस उत्पादक आणि साखर कारखाना कर्मचार्यांचा थकबाकीचा मुद्दा आता तापला आहे. रंगपूर साखर कारखान्याच्या शेतकर्यां बरोबर कर्मचार्यांनी महिमगंज रेल्वे स्टेशनवर थकबाकीच्या मागणी साठी आंदोंलन केले. यामुळे रेल्वे ची ये-जा थांबली. गाइबंधा मध्ये स्थित रंगपूर साखर कारखान्याचे कर्मचारी चार महिन्याच्या ऊस थकबाकी भागवण्याच्या मागणीसाठी संपावर गेले आहेत. ऊस शेतकर्यांनाही आतापर्यंत थकबाकी मिळालेली नाही. ज्यामुळे शेतकरी खूपच आक्रमक झाले आहेत.
रंगपूर साखर कारखाना कर्मचारी संघाचे अध्यक्ष अबू सूफियान रॅलीचे अध्यक्ष होते. सूफियान म्हणाले, विविध सरकारी संघटनांच्या श्रमिकांना आणि कर्मचार्यांना ईद उल अजहा साठी पगार आणि बोनस मिळाला आहे. पण आम्हाला आतापर्यंत चार महिन्यांची थकबाकी आणि पगार मिळालेला नाही. त्यांनी मागणी केली की, मजूर, कर्मचारी आणि ऊस शेतकर्यांची थकबाकी ईद पूर्वी भागवणे आवश्यक आहे.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.