ढाका : सरकारच्या निर्देशानंतर साखर रिफायनरींकडून साखरेच्या दरात कपात करण्यात आली आहे. नव्या दरानुसार साखरेची किंमत ७४ टीके प्रती किलो निश्चित करण्यात आली आहे. तर पॅकबंद साखरेची किंमत ७५ टीके प्रती किलो असेल. बांगलादेश शुगर रिफायनरी असोसिएशन, वाणिज्य मंत्रालय आणि मूल्य आयोगाच्यादरम्यान झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला.
जुलै महिन्याच्या अखेरपासून साखरेच्या दरात प्रती किलो २० रुपये म्हणजे ३० टक्क्यांची वाढ झाली आहे. त्या महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात साखरेची किरकोळ किंमत ६० टीके ते ६५ टीके यांदरम्यान होती. त्यानंतर किंमतीत अनेक पटींनी वाढ झाली. या आठवड्याच्या सुरुवातील साखरेच्या दरात ८० टीके पर्यंतची वाढ दिसून आली. त्यामुळे काल किरकोळ विक्रेत्यांकडून साखर ८०-८५ टीके प्रती किलो दराने विक्री केली जात होती.
सिटी ग्रुपमधील कॉर्पोरेट आणि नियामक विषयांचे संचालक विश्वजित साहा म्हणाले, सरकारकडून निश्चित केलेले नवे दर लागू केले जातील. साखर व्यावसायिक संघाचे उपाध्यक्ष अबुल हसीम यांनी सांगितले की, त्यांना नव्या दरांची माहिती अद्याप मिळालेली नाही. किरकोळ स्तरावर नवी दर आकारणी लागू करणे शक्य नसल्याचा दावा त्यांनी केला. साखर कारखानदारांकडून ७४ टीके प्रती किलो दर घेतला जात असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, साखर उद्योगातील सूत्रांनी सांगितले की, नवे दर लागू करणे शक्य होणार नाही. कारण, आंतरराष्ट्रीय स्तरावरील दर वाढलेले आहेत. त्याशिवाय, उत्पादन खर्च तसेच मालाची हमालीचे दरही वाढीव आहेत.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link