बांगलादेशातील रिफायनर्सनी सोयाबीन तेल आणि साखरेच्या दरात ५ टका (Tk–बांगलादेशी चलन) कपातीची घोषणा केली आहे.
याबाबत, शुगर रिफायनरी असोसिएशनने म्हटले आहे की, रविवारपासून पॅकेज्ड साखरेची किंमत १३५ टका (Tk) प्रती किलोग्राम करण्यात आली आहे. तर विक्री केल्या जाणाऱ्या खुल्या साखरेचा दर १३० टका (Tk) असेल.
व्यापारी यापूर्वी सरकार आणि रिफायनर्सकडून निर्धारीत केलेल्या किमतीपेक्षा जादा दराने साखरेची विक्री करीत होते.
अलिकडेच बांगलादेशात साखरेचे दर गगनाला भिडले होते. त्यामुळे नागरिकांना महागाईची झळ सोसावी लागत होती.