बांगलादेशात व्यापाऱ्यांना साखरेच्या दरात वाढ करण्याची अपेक्षा

ढाका : बांगलादेशातील व्यापारी सरकारकडून निश्चित केलेल्या किमतीच्या तुलनेत जादा दराने साखर विक्री करत आहेत. ते यामध्ये आणखी वाढ होण्याची अपेक्षा करीत आहेत. ढाक्याच्या बाजारात खुली साखर १३५ टका (Taka – बांगलादेशाचे चलन) प्रती किलो आणि पॅक्ड साखर १४०-१५० टका प्रती किलोवर विक्री केली जात आहे. मात्र, वाणिज्य मंत्रालयाने एक महिन्यापूर्वी याचा दर १२० चका आणि १२५ टका असा निश्चित केला आहे.

वाणिज्य सचिव तपन कांती घोष यांनी किमती नियंत्रणविषयक बैठकीनंतर सांगितले की, शुगर रिफायनर्स असोसिएशनने आता टेरिफ कमिशनला एक प्रस्ताव पाठवला आहे. यामध्ये खुली साखर १४० टका आणि पॅकेज्ड साखर १५० टका पर्यंत वाढविण्याची मागणी केली आहे. जेव्हा जागतिक बाजारपेठेत अस्थिरता असते, तेव्हा बाजार स्थिर ठेवणे कठीण बनते असा दावा असोसिएशनने केला आहे.

तपन म्हणाले की, बांगलादेशमधील कारखानदार एक महिन्यापूर्वी निश्चित केलेल्या किमतीशी सहमत होते. मात्र, आंतरराष्ट्रीय बाजारातील दरवाढीने नवे दर लागू करण्यात आले नाहीत. जागतिक दरवाढीमुळे बांगलादेशच्या व्यापार महामंडळालाही आंतरराष्ट्रीय निविदेच्या माध्यमातून साखर आणणए शक्य झालेले नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here