ढाका : उशीरा झालेल्या उसाच्या लागवडीमुळे उतारा खालावण्यासह उसाच्या वजनात मोठी घट आली आहे. त्यामुळे बांगलादेशातील ऊस उत्पादकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान सोसावे लागले आहे. उत्तर विभागातील कारखाने वगळता बहुतांश कारखान्यांचा साखर उतारा ५.२० टक्क्यांपेक्षा कमी आहे.
बांगलादेशमधील उसाचा सरासरी उतारा जगातील दोन मोठे ऊस उत्पादक देश असलेल्या ब्राझिल आणि भारताच्या निम्मा आहे. उत्तर विभागातील एका कारखान्याच्या विभागीय व्यवस्थापकांनी सांगितले की, ऊस उत्पादक शेतकऱ्यांसह कारखानदारांना यंदा मोठा फटाका बसला. तोटा कमी करण्यासाठी २०२०-२१ या आर्थिक वर्षात सहा साखर कारखान्यांनी साखर उत्पादन बंद केले होते.
गेल्यावर्षी नोव्हेंबर अखेरपर्यंत बांगलादेश साखर आणि खाद्य उद्योग महामंडळाने (बीएसएफआयसी) कारखान्यांचा तोटा कमी करण्यासाठी पंधरा कारखान्यांपैकी सेताबगंज साखर कारखाना, श्यामपूर साखर कारखाना, रंगपूर साखर कारखाना, पंचगढ साखर कारखाना, पबना साखर कारखाना आणि कुशतिया साखर कारखाना बंद करण्याचा निर्णय घेतला होता. बांगलादेश साखर आणि खाद्य उद्योग महामंडळाने उर्वरीत नऊ युनीट सुरळीत चालण्यासआठी पहिल्या सहा बंद कारखान्यांच्या कार्यक्षेत्रातील ऊस खरेदी करण्याचाही निर्णय घेतला होता.