ढाका : बांगलादेश सरकारने खुल्या निविदेच्या माध्यमातून सध्याच्या किरकोळ दरापेक्षा कमीत कमी ६० टका कमी किमतीवर साखर आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. कॅबिनेट समितीने बुधवारी बांगलादेश सरकारकडून संचलित ट्रेडिंग कॉर्पोरेशनसाठी यूएसस्थित एक्सेंचुएट टेक्नॉलॉजी Inc कडून ६६२.७ मिलियन टकापेक्षा अधिक दराची १२,५०० टन रिफाईंड साखर खरेदी करण्याच्या प्रस्तावास मंजुरी देण्यात आली. आयात साखरेचा दर ८२.८५ टका प्रती किलो असेल. कॅबिनेट डिव्हीजनचे अतिरिक्त सचिव सैयद महबूब खान यांनी सांगितले की, बांगलादेशने आधीच तुर्कीकडून ८२.९४ टका प्रती किलो दराने साखर खरेदी केली होती.
सरकारने आयात खर्चामुळे साखरेच्या दरात १६ टका प्रती किलो वाढ केली आहे. १० मे रोजी खुल्या साखरेची किरकोळ किंमत १२० टका आणि पॅकिंग केलेल्या साखरेची किंमत १२५ टका निश्चित करण्यात आली. ग्राहकांना खुल्या बाजारात सध्या पॅकिंग नसलेली साखर १४० टकापेक्षा कमी दराने खरेदी करावी लागत आहे. काही कंपन्या पॅकिंग केलेली साखर १५० टका प्रती किलोने विक्री करीत आहेत. महागाईमुळे ग्राहकांना दिलासा देण्यासाठी सरकारने साखर आयातीचा निर्णय घेतला आहे.