नवी दिल्ली: सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या विलिनीकरणाच्या निर्णयाविरोधात 26 आणि 27 सप्टेंबर या दोन दिवशी संपूर्ण देशात बँक कर्मचार्यांनी संपाची हाक दिली होती. हा संप मागे घेण्यात आल्याने, अर्थिक व्यवहारासाठी पूर्णपणे बँकांवर अवलंबून असणार्या सामान्य जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे.
यूनियन लिडर अणि वित्त सचीव राजीव कुमार यांच्यामध्ये झालेल्या चर्चेनंतर हा संप मागे घेण्यात आला आहे. बँक युनियनने म्हटले आहे की, त्यांच्या मागण्या सरकारने गंभीरतेने घेतल्या आहेत आणि त्यावर विचार करण्याचे आश्वासनही दिले आहे.
या संपात ऑल इडिया बँक ऑफिसर्स कन्फडरेशन, ऑल इंडिया बँक ऑफिसर्स असोसिएशन, इंडियन नॅशनल बँक ऑफिसर्स काँग्रेस आणि नॅशनल ऑर्गनायझेशन बँक ऑफिसर्स यांनी सहभाग घेतला होता.
गेल्याच महिन्यात वित्तमंत्री निर्मला सितारामन यांनी बँकांच्या विलिनीकरणाची घोषणा केली होती. त्या म्हणाल्या होत्या की, सरकारी क्षेत्रातील 10 बँकांचे विलिनीकरण होवून 4 नव्या बँका तयार केल्या जातील. या निर्णयानंतर विविध ट्रेड यूनियन ने याचा विरोध केला होता.
या संपामुळे लोकांना चार दिवस अडचणींचा सामना करावा लागला असता, कारण 26 आणि 27 हे संपाचे दिवस सोडून, 28 सप्टेंबरला महिन्याचा शेवटचा शनिवार आणि 29 सप्टेंबरला रविवार आहे. त्यामुळे बँका सलग चार दिवस बंद राहिल्या असत्या. पण संप मागे घेण्यात आल्याने जनतेला दिलासा मिळाला आहे.
हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.