महाराष्ट्रातील एकूण 172 पैकी 49 साखर कारखान्यांनी सॉफ्ट लोनसाठी सादर केलेल्या अर्जांना बँकांनी फेटाळले. सॉफ्ट लोनसाठी महाराष्ट्रातील बँकांकडून 2,559.02 करोड रुपये मंजूर करण्यात आले होते. जून अखेरपर्यंत या कर्जासाठी अर्ज सादर करायचे होते. त्यानंतर आलेल्या 49 साखर कारखाने हे सॉफ्ट लोन मिळवण्यात अपयशी ठरले आहेत.
उस उत्पादकांना त्यांची मूलभूत एफआरपी देण्याकरीता असमर्थता दर्शवणार्या साखर कारखान्यांसाठी केंद्र सरकारने मार्चमध्ये सॉफ्ट लोन योजनेची घोषणा केली होती. 10,540 कोटीचे कर्ज 10.50 टक्के व्याजदराने बँका साखर कारखान्यांना देतात. या कर्जाचा वापर कारखाने त्यांच्या एफआरपी देणी पूर्ण करण्यासाठी वापरतात.
महाराष्ट्र स्टेट को ऑप बँकांकडे आलेल्या 60 कर्ज प्रस्तावातील फक्त 45 कर्ज प्रस्ताव मंजूर झाले आहेत. जिल्हा मध्यवर्ती बँकांकडे 61 प्रस्ताव आले होत, त्यातील 55 प्रस्ताव मंजूर झाले होते. राष्ट्रीय बँकांकडून 37 पैकी 15 प्रस्तावास मंजूरी मिळाली होती. तर ग्रामीण बँकांकडून 13 पैकी 7 प्रस्ताव मंजूर झाले होते. एकूण मंजूर झालेल्या 2,559 कोटी रुपये कर्जांपैकी आजपर्यंत कारखान्यांना 2,510.64 इतकेच कर्ज मंजूर झाले आहे.
हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.