गेल्या काही दिवसात वित्त मंत्री निर्मला सितारामन यांनी पीएनबी सह देशातील अनेक मोठ्या बँकांच्या विलिनीकरणाची घोषणा केली होती. सरकारच्या या निर्णयाविरोधात बँकिंग क्षेत्रातील ट्रेड यूनियन संपावर जाणार आहेत. बँक कर्मचार्यांच्या संपामुळे या महिन्यात लागोपाठ चार दिवस बँका बंद राहणार आहेत.
बँकींग क्षेत्राच्या चार ट्रेड यूनियन च्या संघटनांनी 25 सप्टेंबर च्या मध्यरात्रीपासून 27 सप्ेटंबर च्या मध्यरात्रीपर्यंत संपाची हाक दिली आहे. यामुळे 26 आणि 27 सप्टेंबर हे दोन दिवस सामान्य नागरीकांच्या बँकेशी निगडित असणार्या कामांवर परिणाम होणार आहे.
यानंतर 28 सप्ेटंबरला महिन्याचा चौथा शनिवार आणि 29 सप्ेटंबरला रविवार असल्याने बँका लागोपाठ चार दिवस बंद राहणार आहेत. यामुळे 25 सप्टेंबरपर्यंत बँकांची कामे आवरुन घ्यावीत. अन्यथा 30 सप्ेटंबरपर्यंत बँकांच्या कामासाठी थांबावे लागेल.
सरकारच्या बँक विलिनीकरणाच्या निर्णयाच्या लागू होण्यानंतर 4 नव्या बँका अस्तित्वात येतील. अर्थात 6 बँकांचे दुसर्या बँकांमध्ये विलिनीकरण होईल. पहिल्यांदा पंजाब नॅशनल बँकेमध्ये यूनायटेड बँक ऑफ इंडिया आणि ओरिएंटल बँक विलिन होईल. 5 सप्ेटंबरला पीएनबीच्या निर्देशन मंडळाने या विलिनीकरणाला सैद्धांतिक मंजूरीही दिली आहे.
अशा प्रकारे यूनियन बँक ऑफ इंडिया, आंध्रा बँक आणि कॉर्पोरेशन बँक एकरुप होवून दुसरी विलिनीकरण प्रक्रिया पूर्ण होईल. यूनियन बँकेच्या निर्देशन मंडळाने या प्रक्रियेला मान्यता दिली आहे. याशिवाय कैनरा बँकमध्ये सिंडीकेट बँकेचा समावेश होईल. तर चौथे विलिनकरण इंडियन बँकेत अलाहाबाद बँकेचा समावेश होवून पूर्ण होईल.
या विलिनीकरणानंतर देशात 12 पीएसबीएस बँक राहतील. यापूर्वी 2017 मध्ये सार्वजनिक क्षेत्रातील 27 बँका होत्या.
हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.