ऑगस्टमध्ये इतके दिवस बंद राहणार बँका, पहा सुट्ट्यांची यादी

जर तुमचे ऑगस्ट महिन्यामध्ये कोणतेही बँकेचे काम असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आवश्यक आहे. लॉकडाउनमध्ये बँका खुल्या होणे आणि बंद होण्याच्या टाइमिंग मध्ये थोडासा बदल झाला आहे पण, पूर्ण लाकॅडाउन मध्ये बँक कर्मचारी काम करत आहेत. ऑगस्ट महिन्यामध्ये बँकेच्या सुट्यांच्या बाबतीत बोलायचेतर, ऑगस्टमध्ये 13 दिवस बँका बंद राहणार आहेत. यामध्ये रविवार आणि दुसरा व चौथा शनिवारही सामिल आहे. अशामध्ये हे पाहणे महत्वाचे आहे की कुठल्या दिवशी बँका खुल्या आणि कुठल्या दिवशी बँका बंद राहणार आहेत.

बँकांच्या सुट्ट्यांची सुरुवात बकरी ईद पासून सुरु होवून 31 ऑगस्ट रोजी असणार्‍या ओणम सणा झाल्यावर संपेल. 1 ऑगस्ट ला बकरी ईद च्या निमित्त बँक बंद राहतील. याच्या दुसरयाच दिवशी रविवार आहे. 3 ऑगस्ट ला रक्षा बंधन मुळे बँकेला सुट्टी असणार आहे. 8 ऑगस्ट ला दुसरा शनिवार तर 9 ऑगस्टला रविवार आहे. 11 ऑगस्ट ला जन्माष्टमीची तर 13 ऑगस्टला पेट्रीयाट डे च्या निमित्ताने इम्फाळ झोनमध्ये बँकांना सुट्टी असणार आहे. 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिवस साजरा केला जाईल. 15 ऑगस्टलाही सर्व झोनमधील बँका बंद राहतील. 20 ऑगस्ट ला श्रीमंत संकरादेव च्या तिथिमुळे बँक बंद राहतील. 21 ऑगस्ट ला हरितालिका सणामुळे बँक बंद राहतील. 22 ऑगस्टला गणेशचतुर्थी मुळे बँकेत कामकाज होणार नाही. 29 ऑगस्टला कर्मा पूजेमुळे बँकांना सुट्टी असेल. 31 ऑगस्ट ला इंद्रयात्रा आणि तिरुओणम मुळे बँकांना सुट्टी राहील.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here