नवी दिल्ली : पुढच्या महिन्यात सणासुदीचा हंगाम सुरु होत आहे. त्यामुळे या महिन्यात ऑफिस आणि बँकांना अधिक सुट्टया आहेत. याच महिन्यात दसरा आणि दिवाळी दोन्ही सण येतात. यामुळे बँक आणि सरकारी कार्यालयांना सुट्टी राहणार आहे. ऑक्टोबरमध्ये ११ दिवस सुट्टी आहे. या महिन्यात एकूणच २० दिवस काम होईल. सुट्टीची सुरुवात २ ऑक्टोबर पासून होत आहे.
बुधवारी (दि. २ ऑक्टोबर) गांधी जयंतीमुळे बँका सुट्टी राहणार आहे. यानंतर ७ आणि ८ ऑक्टोबरला रामनवमी आणि दसरा यामुळे बँका बंद राहतील. यापूर्वी ६ ऑक्टोबरला रविवार असल्याने बँका सलग ३ दिवस बंद राहतील. १२ ऑक्टोबरला या महिन्याचा दूसरा शनिवार आणि १३ ला रविवार असल्याने सलग २ दिवस बँका बंद राहतील. २० ऑक्टोबरला रविवार असल्याने सुट्टी राहील.
दिवाळीमध्ये २६ ऑक्टोबरला चौथा शनिवार आणि २७ ला रविवार आहे. दिवाळी पण रविवारी आहे. २९ ऑक्टोबर ला भाउबीज आहे.
हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.