ब्रिजस्टोन : देशात गेल्या आठवड्यात अधिकृतपणे २०२१ च्या गळीत हंगामास सुरुवात झाली. सेंट फिलिपच्या एजगेकुम्बे, रॉक हॉल आणि फोरस्क्वेअर अशा विविध क्षेत्रात गळीत हंगामाच्या हालचाली सुरू आहेत. पोर्टवले साखर कारखान्याचे उप संचालन व्यवस्थापक मार्लन मुनरो यांनी सांगितले की, मार्चच्या पहिल्या आठवड्यात गाळप सुरू झाले आहे. जून महिना अखेरीस हंगाम पूर्ण होईल अशी अपेक्षा असल्याचे त्यांनी सांगितले.
कृषी आणि खाद्य सुरक्षा मंत्री इंद्र वियर यांनी सांगितले की, कोरोना महामारीमुळे उत्पादनात घसरण झाली असूनही यावर्षी बार्बाडोसमध्ये उत्पादन वाढीची अपेक्षा आहे. गेल्या वर्षी उसाचे उत्पादन ९०००० टन झाले होते. यंदा ते १०७००० टन होईल अशी अपेक्षा आहे. चांगला पाऊस झाला असल्याने ऊस उत्पादन २०२० मधील १२.१४ टक्क्यांवरुन २०२१ मध्ये १७.७४ प्रती एकर होण्याची शक्यता आहे.