बस्ती : वाल्टरगंज साखर कारखान्याच्या ऊस शेतकर्यांच्या प्रलंबित 55 करोड रुपये थकबाकीच्या वसुलीसाठी बस्ती साखर कारखान्याचा लिलाव होणार. हा लिलाव 13 जुलै ला होणार आहे.
जिल्हाधिकारी आशुतोष निरंजन यांनी सांगितले की, वाल्टरगंज साखर कारखान्याची प्रलंबित ऊस थकबाकी वसुल करण्यासाठी 13 जुलैला बस्ती शुगर कारखान्याच्या सर्व संपत्तीचा लिलाव केला जाईल. ही कारवाई ऊस आयुक्त यांच्याआदेशावरून केली जात आहे. त्यांनी सांगितले की, बस्ती तसेच वाल्टरगंज साखर कारखाना एकाच ग्रुपचे आहेत. बस्ती सागर कारखान्याच्या तीन लॉट मधील संपत्तीचा लिलाव यापूर्वी केला आहे. उर्वरीत आठ लॉटचे मुल्यांकन 25 करोड 88 लाख रुपये केले गेले आहे. बस्ती साखर कारखान्याची जवळपास सहा हेक्टर भूमिदेखील न्यायालयीन आदेशानुसार जप्त केली आहे. वाल्टगंज साखर कारखान्याकडून वर्ष 2016-17 तसेच 2017-18 चे 55.75 करोड रुपये देय आहेत. याशिवाय 10 करोड 70 लाख श्रमदेय, तसेच 40 लाख विजेचे बिल बाकी आहे.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.