कर्नाटकच्या कामगार कायद्यात बदल, कारखान्यांत आता १२-१२ तासांची शिफ्ट

ॲपलसाठी आयफोनसह विविध इलेक्ट्रिकॉनीक वस्तू तयार करणारी तैवानची कंपनी फॉक्सकॉन कर्नाटकमध्ये एक मोठा प्लांट सुरू करणार आहे. यासाठी कंपनी मोठी गुंतवणूक करेल. या प्लांटमधून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल. यादरम्यान, एक चिंताजनक बाब समोर आली आहे. याबाबत फायनान्शिअल टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, ॲपल आणि फॉक्सकॉनच्या दबावानंतर कर्नाटक सरकारने कामगार कायद्यात बदल केले आहेत. त्यानुसार, कर्नाटकमधील कंपन्या आता कारखान्यात तीन ऐवजी दोन शिफ्टमध्ये काम करू शकतील. म्हणजेच कर्नाटकमध्ये आता ९-९ तासांच्या शिफ्टऐवजी १२-१२ तासांची शिफ्ट असेल.

एबीपी लाईव्हने दिलेल्या वृ्त्तानुसार, कायद्यातील नव्या बदलांनुसार एका आठवड्यात जास्तीत जास्त ४८ तास काम करण्याची परवानगी असेल. तर तीन महिन्यांसाठी ओव्हरटाइम ७५ तासांऐवजी १४५ तास करण्यात आला आहे. तैवानची कंपनी फॉक्सकॉन आता चीनचे झिंगझोऊ या शहरातील प्लांटमध्ये आयफोन बनवते. या प्लांटमध्ये २ लाख लोक काम करतात. मात्र, कोविड १९ व इतर कारणांनी उत्पादनावर परिणाम झाला आहे. त्यामुळे फॉक्सकॉनने इतर पर्यायांवर विचार सुरू केला आहे. अमेरिका-चीन यांच्यातील तणावामुळे कंपन्यांकडून आपले उत्पादन इतर देशांत शिफ्ट केले जात आहे. या अनुषंगाने कंपनी बेंगळुरू एअरपोर्टजवळ ३०० एकर जागेत प्लांट सुरू करेल. ही फॉक्सकॉनची फ्लॅगशीप युनिट असेल. येथून एक लाख रोजगार मिळतील अशी अपेक्षा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here