बीड : गेवराई तालुक्यातील सर्वसामान्य मतदारांसह जयभवानी सहकारी साखर कारखान्याचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे विधानसभेच्या निवडणुकीत मोठे योगदान आहे. कर्मचाऱ्यांच्या सेवा सचोटीमुळे कारखानाही उत्तरोत्तर प्रगतीपथावर असल्याचे मत आमदार विजयसिंह पंडित यांनी व्यक्त केले. गढी (ता. गेवराई) येथे जयभवानी सहकारी साखर कारखान्याचा ४२ व्या गळीत हंगामाची सांगता माजी मंत्री शिवाजीराव पंडित, दत्ता महाराज गिरी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली. याप्रसंगी कारखान्याचे संचालक मंडळ, अधिकारी, कर्मचारी यांच्या वतीने आमदार पंडित यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. चे
अरमन तथा माजी आमदार अमरसिंह पंडित, व्हाईस चेअरमन भाऊसाहेब नाटकर, बाजार समितीचे सभापती मुजीब पठाण यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. यंदाच्या हंगामात अंत्यत प्रतिकूल परिस्थितीत जयभवानीने ४ लाख ४१ हजार मेट्रिक टन ऊसाचे यशस्वी गाळप झाले असून चेअरमन अमरसिंह पंडित यांच्या नियोजनात कारखान्याची वर्षानुवर्ष प्रगती होत आहे, असेही त्यांनी सांगीतले. प्रास्ताविक जनरल व्यवस्थापक दत्तात्रय टेकाळे यांनी केले तर शेवटी आभार कार्यकारी संचालक राजेंद्र खडप यांनी आभार मानले. कारखान्याचे संचालक मंडळ, सभासद, उस उत्पादक शेतकरी, कामगार, अधिकारी, व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.