बीड : हिरापूर (ता. गेवराई) येथील साईप्रसाद नॅचरल शुगर कारखान्याचा तिसरा गळीत हंगाम सुरू होत आहे. कारखान्याचे अध्यक्ष, संचालकांच्या हस्ते विधीवत पुजा करून बॉयलर अग्निप्रदीपन कार्यक्रम झाला. बळीराम गवते, सचिन दाभाडे, प्रज्ञेश पराड यांच्या हस्ते बॉयलर अग्नी प्रदिपन करण्यात आले. तर, अध्यक्ष बबन गवते, काशिबाई गवते, उपाध्यक्ष महेश दाभाडे, प्रभाकर पराड यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. कार्यक्रमाला हनुमान मुळीक, राहुल य वायकर, जोगदंड यांची उपस्थिती होती. तीन वर्षांपूर्वी सुरु केलेला कारखाना सलग ऊसाचे विक्रमी गाळप करत आहे.
बीड व गेवराई तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी संजीवनी ठरलेल्या या कारखान्याने मागच्या वर्षी ऊसाला सर्वाधिक भाव दिल्याने शेतकऱ्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. साईप्रसाद नॅचरल शुगरने गेल्यावर्षी दर पंधरा दिवसाला शेतकऱ्यांना गाळप केलेल्या ऊसाची बिले अदा करुन सर्वाधिक दरही दिला. याशिवाय, परिसरातील कोणत्याही शेतकऱ्यांचा ऊस शेतात राहणार नाही यासाठी संपुर्ण ऊसाचे गाळप होईपर्यंत कारखाना सुरू ठेवला. यावर्षी जिल्ह्यात चांगला पाऊस झाला आहे. ऊसाचे क्षेत्रही वाढलेले आहे. त्यामुळे बीड व गेवराई भागातील उस उत्पादक शेतकऱ्यांना साईप्रसाद शुगर मोठा आधार बनला आहे.
साखर उद्योगाविषयी अधिक घडामोडी जाणून घेण्यासाठी, Chinimandi.com वाचत रहा.