मुंबई : चीनी मंडी
महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यामध्ये ३०० ग्रामीण महिलांच्या विविध संघटनांनी ऊस शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबाच्या मदतीसाठी ७५ लाख रुपये जमवले आहेत. नवचेतना सर्वांगीण विकास केंद्र (NSVK), महिलांकडून चालवले जाते. ही संस्था बीडच्या आसपास असणारा दलित समाज आणि गैर- अधिसूचित जमातीं, भूमिहीन श्रमिक आणि प्रवासी ऊस मजूरांसाठी काम करते.
नवचेतना सर्वांगीण विकास केंद्र लॉकडाउन दरम्यान अशा कामात अग्रेसर आहे. आतापर्यंत नवचेतना सर्वांगीण विकास केंद्र ३०० गावांमध्ये ७,००० कुटुंबांपर्यंत मदत पोचवण्यात यशस्वी झाले आहे. NSVK च्या संस्थापक मनीषा घुले म्हणाल्या, यावर्षी, हजारो ऊस कर्मचारी लॉकडाउन मुळे आपल्या गावा मध्ये परत आले आहेत, पण त्यांना इतर गावकऱ्यांच्या असंतोषाचा सामना करावा लागत होता. गावकऱ्यांना भिती होती की, बाहेरून आलेल्या ऊस श्रमिकांना कदाचित कोरोना वायरस चे संक्रमण झाले असावे. घुले म्हणाल्या की, ऊस श्रमिकांच्या कुटुंबियांना रेशन, आरोग्य आणि स्वच्छते संदर्भातील मदत देण्यासाठी NSVK ने तात्काळ पावले उचलली आहेत. NSVK आता बीडमध्ये अन्य ३,००० कुटुंबांपर्यंत मदत पोचवण्यासाठी क्राउड फंडिंग च्या माध्यमातून पैसे जमवण्याच्या विचारात आहे.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.