थंडीला सुरुवात, शेतकऱ्यांकडून गव्हाच्या लागवडीसाठी तयारी

बुलंदशहर : हिवाळ्यासारखे हवामान तयार झाल्याने शेतकऱ्यांनी आता गव्हाच्या लागवडीची तयारी सुरू केली आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात शेतकरी गहू लागवड करतील. यासाठी डीएपी, युरीयाची खरेदी करण्यात येत आहे. जिल्ह्यात खतांची कोणतीही टंचाई नाही. शेतकऱ्यांना वेळेवर बियाणे मिळत आहे. आता गव्हाची लागवड सुरू झाल्याने कृषी विभागान शासनाकडे खतांची मागणी नोंदवली आहे. नोव्हेंबरपूर्वी याची पूर्तता होईल, असे कृषी विभागाचे म्हणणे आहे.

लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, जिल्हा कृषी अधिकारी राहुल तेलतिया यांनी सांगितले की, सध्या २० हजार मेट्रिक टन युरिया, पाच हजार मेट्रिक टन डीएपी आणि १२०० मेट्रिक टन एनपीके उपलब्ध आहे. नोव्हेंबर महिन्यात कृषी विभागाला युरीया, डिएपीचे चार रॅक मिळणार आहेत. मेरठ मंडळातील बुलंदशहर कृषी प्रधान जिल्हा आहे. गव्हाच्या लागवडीवेडी शेतकऱ्यांसमोर मोछे आव्हान असते. ८७ हजार मेट्रिक टन युरिया, २९ हजार टन डीएपी आणि ६२०० मेट्रिक टन एनपीकेचे उद्दिष्ट आहे. पीओएस मशीनद्वारे शेतकऱ्यांकडून खरेदी प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here