मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाला घेराव घालण्याचा ऊस उत्पादक शेतकऱ्यांची इशारा

बेळगाव : बेळगावमध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी राज्य सरकारकडून त्यांच्या मागण्या पूर्ण केल्या गेल्या नसल्याने ३१ डिसेंबर रोजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या निवासस्थानाला घेराव घालण्याचा इशारा दिला आहे.

याबाबत, इंडिया टुडेमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, शेतकऱ्यांनी सांगितले की, ते सोमवारपासून आपले आंदोलन तीव्र करीत आहेत. राज्य सरकार त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत आहे. जर आताही सरकारने आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत, तर आम्ही मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाला घेराव घालण्याचा निर्णय घेतला आहे.

शेतकऱ्यांनी सांगितले की, ते २६ डिसेंबरपासून धरणे आंदोलन सुरू करतील आणि उपोषण करतील. त्यांनी सांगितले की, जर ३० डिसेंबरपर्यंत त्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर ३१ डिसेंबर रोजी बेंगळुरू येथे मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाला घेराव घातला जाईल. सरकारने ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांची पूर्तता केली नसल्याचा आरोप करण्यात आला. यावेळी एफआरपीमध्ये वाढ, ऊस तोडणी आणि वाहतुकीच्या दरातील तफावत दूर करणे, उसाच्या उप उत्पादनांच्या नफ्याचे शेतकऱ्यांसोबत वाटप करणे आदी मागण्यांचा यात समावेश आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here